जागतिक महिला दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांना गिफ्ट दिले. नारी शक्तीला नमन करत त्यांनी एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत 100 रुपयांची कपात करण्याची घोषणा केला. 1 मार्च रोजी सरकारी कंपन्यांनी व्यावसायिक गॅसच्या किंमतीत वाढ केली. पण घरगुती गॅसच्या किंमतीत कोणताही बदल केला नव्हता.
आज 8 मार्च, जागतिक महिला दिनी सिलेंडरच्या किंमती 100 रुपयांनी स्वस्त करण्यात आल्या. गेल्या काही वर्षांत सिलेंडरचे भाव दुप्पटीहून अधिक झाले. काही महिन्यांपूर्वी तर हा भाव 1100 रुपयांच्या घरात पोहचला होता. त्यानंतर सरकारने त्यात 200 रुपयांची कपात केली होती. सबसिडी असलेल्या 14.2 किलोग्रम घरगुती गॅस आता शंभर रुपयांनी स्वस्त झाला आहे.या निर्णयामुळे देशातील लाखो कुटुंबांवरील आर्थिक बोजा कमी होईल.
नारी शक्ती अंतर्गत कुकींग गॅसची किंमत कमी झाल्याने त्यांना मोलाची मदत ठरणार असल्याचे पंतप्रधानांनी स्पष्ट केले. महिलांचे जीवन सुसह्य करणे आणि त्यांना बळ देण्यासाठी आमचे सरकार प्रयत्न करत असल्याचे ते म्हणाले.काही वर्षांपूर्वी 500 रुपयांच्या पण आत मिळणारे घरगुती गॅस सिलेंडर 1100 रुपयांच्या घरात पोहचले होते. याविषयी ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे दिवाळीच्या जवळपास केंद्र सरकारने 200 रुपयांची सबसिडी दिली होती. त्यानंतर दिल्लीत 14.2 किलोग्रॅम सिलेंडरची किंमत 903 रुपये, कोलकत्तामध्ये 929 रुपये, मुंबईत 902.50 रुपये आणि चेन्नईत हा भाव 918.50 रुपये आहे.