गरजू आणि गरीब कुटुंबासाठी सरकारच्या वतीनं विविध योजना राबवल्या जातात. या योजनांच्या माध्यमातून सरकार त्यांना आर्थिक पाठबळ देण्याचं काम करते. कोरोना संकटाच्या काळात मोदी सरकारने एक योजना सुरू केली होती, जी आता चांगलीच लोकप्रिय झाली आहे. या योजनेत गरजूंना 50 हजार रुपयांपर्यंतचे कर्ज कोणत्याही हमीशिवाय मिळते. ही योजना जे लहान व्यवसाय सुरू करू इच्छितात त्यांच्यासाठी आहे. पंतप्रधान स्वानिधी योजना (PM Svanidhi Yojana) असं या सरकारी योजनेचे नाव आहे.
ही योजना खासकरून रस्त्यावरील विक्रेत्यांसाठी आहे, ज्यांच्या रोजगाराची कोरोना महामारीच्या काळात मोठ्या प्रमाणात हानी झाली होती, अशा लोकांना मदत करण्यासाठी सरकारने पीएम स्वानिधी योजना सुरू केली. मात्र या योजनेचे यश पाहून सरकारने त्याची व्याप्ती वाढवली आहे. या योजनेंतर्गत रोजगार सुरू करण्यासाठी सरकार कोणत्याही हमीशिवाय कर्ज देत आहे. या योजनेअंतर्गत रस्त्यावर छोटे मोठे व्यवसाय करणाऱ्यांना कर्ज देते. पीएम स्वानिधी योजनेअंतर्गत, सरकार रस्त्यावरील विक्रेत्यांना त्यांचे काम पुन्हा सुरू करण्यासाठी कर्ज देते. भाजी विक्रेते, फळ विक्रेते आणि फास्ट फूडची छोटी दुकाने चालवणारे लोक या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
केंद्र सरकार पीएम स्वानिधी योजनेच्या माध्यमातून 50 हजार रुपयांपर्यंतचे कर्ज देते. पण 50 हजार रुपयांचे कर्ज घेण्यासाठी तुम्हाला तुमची विश्वासार्हता निर्माण करावी लागेल. त्यामुळं या योजनेअंतर्गत कोणालाही 10,000 रुपयांचे पहिले कर्ज मिळेल. एकदा कर्जाची परतफेड केल्यानंतर दुप्पट रक्कम दुसऱ्यांदा कर्ज म्हणून घेता येते.
या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या कोणत्याही सरकारी बँकेत जाऊन तिथे अर्ज करावा लागेल. त्यासोबत काही महत्त्वाची कागदपत्रे जोडावी लागतील. त्यानंतर या फॉर्मसोबत फॉर्म आणि कागदपत्रे जोडावी लागतील. यानंतर, तुमचा फॉर्म आणि तुमच्या कामाची छाननी केली जाते. सर्वकाही योग्य आढळल्यास, तुम्हाला कर्जाची रक्कम दिली जाते.
आवश्यक कागदपत्रे
अर्जदाराचे ओळखपत्र आणि आधार कार्ड
अर्जदार करत असलेल्या कामाची माहिती
पॅन कार्ड
बँकेत बचत खाते असणे आवश्यक
उत्पन्नाचा स्रोत
हमी आवश्यक नाही
केंद्र सरकार देशातील अल्पभूधारकांना कर्ज देण्याची सुविधा उपलब्ध करून देत आहे. या योजनेचा लाभ कोणताही लहान आणि मध्यम व्यवसायिक घेऊ शकतो. स्वानिधी योजनेंतर्गत केंद्र सरकार 50 हजार रुपयांपर्यंत कर्ज देते.
50 हजार रुपयांचे कर्ज घेण्यासाठी तुम्हाला तुमची विश्वासार्हता निर्माण करावी लागेल.
या योजनेंतर्गत कोणालाही प्रथम 10,000 रुपयांचे कर्ज मिळेल.
एकदा कर्जाची परतफेड केल्यानंतर दुप्पट रक्कम दुसऱ्यांदा कर्ज म्हणून घेता येते.
या योजनेअंतर्गत कर्ज घेण्यासाठी कोणत्याही प्रकारची हमी आवश्यक नाही. अर्ज मंजूर झाल्यानंतर, कर्जाची रक्कम तीन वेळा तुमच्या खात्यात हस्तांतरित केली जाते. रस्त्यावरील विक्रेत्यांसाठी कॅश-बॅकसह डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने या योजनेच्या बजेटमध्ये वाढ केली होती.
पीएम स्वानिधी योजनेअंतर्गत घेतलेल्या कर्जाची रक्कम एका वर्षाच्या कालावधीत परत केली जाऊ शकते. तुम्ही दरमहा कर्जाची रक्कम हप्त्यांमध्ये परत करू शकता. पीएम स्वानिधी योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. पीएम स्वानिधी योजनेअंतर्गत कर्ज घेण्यासाठी कोणत्याही सरकारी बँकेत अर्ज करता येतो.