IPO Open : हा आयपीओ झाला सुरु! ग्रे मार्केटमध्ये दमदार घोडदौड…..

र्पोरेट स्टॉक ब्रोकिंग हाऊस पुणे ई-स्टॉक ब्रोकिंगचा आयपीओ सुरु झाला आहे. या आयपीओमधून कंपनीचा 38.23 कोटी उभे करण्याचा मानस आहे. ही कंपनी 2007 मध्ये सुरू झाली.

लेटेस्ट टेक्नोलॉजी, मार्केट रिसर्च आणि अत्याधुनिक ऍनालिटिकल सिस्टम्सचा वापर करुन ही कंपनी ग्राहकांना त्यांची गुंतवणूकीची उद्दिष्टे पूर्ण करण्यात मदत करते.पुणे ई-स्टॉक ब्रोकिंगच्या आयपीओमध्ये पैसे गुंतवण्यासाठी 12 मार्चपर्यंत वेळ असेल. या आयपीओमध्ये 46.06 लाख नवीन शेअर्स जारी केले जातील.

तर या आयपीओसाठीचा प्राइस बँड प्रति शेअर 78-83 रुपये ठेवण्यात आला आहे.आयपीओच्या बोलीसाठी लॉट साइज 1600 शेअर्स आहे. आयपीओ 12 मार्चला बंद झाल्यानंतर, कंपनीच्या शेअर्सची लिस्टींग बीएसई एसएमईवर 15 मार्चला होईल.

शेयर इंडिया कॅपिटल सर्विसेज प्रायवेट लिमिटेड हे पुणे ई-स्टॉक ब्रोकिंग आयपीओसाठी बुक रनिंग लीड मॅनेजर आहे. बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या इश्यूसाठी रजिस्ट्रार आहे. शेअर इंडिया सिक्युरिटीज ही मार्केट मेकर आहे.