काेल्हापुरातील 18 गावे बंद ठेवत हसन मुश्रीफांना दाखविली एकजूट

कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीला विरोध करण्यासाठी आज (गुरुवार) शहरालगत असणा-या 18 गावांनी बंद पुकारला आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी शहरालगतची काही गाव ही हद्दवाढीत समाविष्ट होतील असे म्हटल्यानंतर ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.

कोल्हापूर महापालिकेच्या हद्दवाढीला विरोधी सर्वपक्षीय कृती समितीने पहिल्यापासून विरोध केला आहे. यापूर्वी देखील गावांनी बंद ठेवून निर्णयाचा निषेध नाेंदविला हाेता. आता पून्हा एका गावांनी बंद ठेवत निर्णयास विराेध असल्याचे स्पष्ट केले आहे.

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या निर्णयाला आता 18 गावांनी विराेध दर्शविला आहे. विरोधी कृती समितीचे प्रवक्ते नाथाजीराव पोवार यांच्याबराेबर अन्य नेत्यांनी हद्दवाढीला विरोध केला असून प्रसंगी संघर्ष करण्याची तयारी असल्याचे म्हटले आहे.