जोतिबा चैत्र यात्रेनिमित्त कोल्हापूर जिल्हा टू व्हिलर मेकॅनिक्स असोसिएशनतर्फे सोमवारी २२ एप्रिलल व मंगळवारी २३ एप्रिलला यात्रेकरूंच्या दुचाकी वाहनांची मोफत दुरुस्ती व पंक्चर सेवा दिली जाणार आहे. यामध्ये १०० मेकॅनिक व पंक्चर कारागीर सहभागी होणार आहेत. असोसिएशनच्यावतीने २००१ पासून हा उपक्रम राबवला जात आहे. त्यानुसार यंदाही मोफत सेवा दिली जाणार आहे. यामध्ये न्यू पॉलिटेक्निकमधील ऑटोमोबाईल विभागही सहभागी होणार आहे.
यात्रेच्या ठिकाणी असलेल्या दुचाकी पार्किंगच्या ठिकाणी ही सेवा दिली जाणार असल्याचे नियोजन प्रमुख संजय पाटणकर यांनी सांगितले. या उपक्रमाबरोबरच यंदा जोतिबा मंदिर येथे थंड पाण्याचे वाटपही केले जाणार आहे. सोमवारी सकाळी नऊ वाजता सोन्या मारुती चौकातील राधेय ऑटो सेंटर येथे उपक्रमाचे उद्घाटन होणार आहे.