सुखकर विमान प्रवासाची गॅरंटी! नव्या टर्मिनलचे लोकार्पण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी देशातील विविध विमानतळांचे उद्घाटन करण्यात आले. यात पुण्यातील लोहगाव आणि कोल्हापूर येथील नवीन टर्मिनलचे दूरदृश्य प्रणालीद्वारे लोकार्पण करण्यात आले.या नव्या टर्मिनलमुळे देशातील नागरिकांसाठी विमान प्रवास अधिक सुलभ आणि सुखकर होईल, असे प्रतिपादन पंतप्रधान मोदी यांनी यावेळी केले.

यावेळी लोहगाव विमानतळ येथील कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री दिलीप वळसे-पाटील, मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार मेधा कुलकर्णी, आमदार उमा खापरे, भीमराव तापकीर, माधुरी मिसाळ, सुनील कांबळे, सुनील टिंगरे, सिद्धार्थ शिरोळे, हवाई वाहतूक मंत्रालयाचे सहसचिव असंगबा चुबा आदी उपस्थित होते.

तर, कोल्हापुरातील कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, खासदार संजय मंडलिक, राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आमदार प्रकाश आवाडे, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार चंद्रदीप नरके, माजी आमदार अमल महाडिक, विमानतळ प्राधिकरणाचे पीयूष श्रीवास्तव, प्रकल्प संचालक दिलीप सजनानी, के. डी. दास, विमानतळ व्यवस्थापक अनिल शिंदे उपस्थित होते.