मिसळ पे चर्चा आता थेट पोहचली जेवणाच्या ताटापर्यंत

कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदारसंघात प्रचार टिपेला पोहोचला आहे. महाविकास आघाडी आणि महायुती उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी गाव टू गाव पिंजून काढला आहे.मतदानाच्या दिवशी जास्तीत जास्त मतदान करून घेण्यासाठी स्थानिक पातळीवर स्वतंत्र यंत्रणा तयार असून, सुरुवातीच्या टप्प्यात सुरू असलेली ‘मिसळ पे चर्चा’ आता थेट जेवणाच्या ताटापर्यंत पोहोचली आहे. कोल्हापूर मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे शाहू छत्रपती व महायुतीचे संजय मंडलिक यांच्यात सरळ लढत होत आहे

. आघाडीच्या उमेदवारांनी सुरुवातीच्या टप्प्यात काेल्हापूर शहरासह उपनगर व तालुक्याच्या ठिकाणी मिसळ पे चर्चेचे आयोजन करून वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न केला. महायुतीकडूनही त्यांच्या पावलावर पाऊल टाकत अनेक ठिकाणी मिसळ पे चर्चा आयोजित केली गेली. हातकणंगलेच्या तुलनेत कोल्हापूर मतदारसंघात मिसळ पे चर्चा जरा जादाच रंगली.