सौरऊर्जेवरील हायमास्ट दिव्यांमुळे इचलकरंजी निघणार उजाळून….

इचलकरंजी शहरातील मुख्य ८० चौकांमध्ये सौरऊर्जेवरील हायमास्ट दिवे बसविण्यात येणार आहेत. या माध्यमातून वीज बिलात दरमहा लाखो रुपयांची बचत होणार आहे. हायमास्ट दिव्यांमुळे संपूर्ण चौक उजाळून निघणार आहेत. महानपालिकेतर्फे शहरातील विविध भागांतील चौकांमध्ये सौरऊर्जेवरील हायमास्ट दिवे बसवण्याचा प्रस्ताव तयार केला.

यासाठी आवश्यक १० कोटींचा निधी उपलब्ध होण्यासाठी आमदार प्रकाश आवाडे यांनी शासनाकडे पाठपुरावा सुरू केला होता. कामाची निविदा प्रक्रिया सुरू झालेली आहे. शहरातील पंचगंगा नदीतीरावरील वरद विनायक मंदिर, मरगूबाई मंदिर, फडणीस हौद, लिंबू चौक, शहापूरसह विविध ८० ठिकाणी सौरऊर्जेवरील हायमास्ट दिवे बसवण्यात येणार आहेत.