सोलापूर विभागांतर्गत उभारण्यात येणारे मार्केटिंग केंद्र, जेनेटिक औषध केंद्र यांच्यासह सुरू असलेल्या विविध दोन हजार ६८२ कोटींच्या प्रकल्पाच्या कामांचे उद्घाटन मंगळवारी (ता.१२) सोलापूर रेल्वे स्थानकावर सकाळी ८.३० वाजता होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइनच्या माध्यमातून उद्घाटन होणार असल्याची माहिती विभागीय रेल्वे व्यवस्थापक शैलेंद्र सिंह यांनी पत्रकार परिषदेत दिली. सोलापूर रेल्वे विभागांतर्गत सोलापूर रेल्वे स्थानकावर जेनेटिक औषध केंद्र उभारण्यात येत आहे.
तसेच सोलापूर, कलबुर्गी, कुर्डुवाडी, पंढरपूर, लातूर, कोपरगाव, साईनगर शिर्डी या सहा स्थानकावर वन स्टेशन वन प्रॉडक्टची केंद्र उभारण्यात येणार आहेत. तसेच लातूर येथे ६७६ कोटींचे कोच उत्पादन युनिट तसेच विभागांतर्गत झालेले आणि सुरू असलेले दोन हजार ८२ कोटींचे दुहेरीकरण काम अशा विविध प्रकल्प कामाचे उद्घाटन होणार आहे.