ठाकरेंचा पैलवान सांगलीच्या मैदानात!विशाल पाटलांचे काय?

सांगली हा काँग्रेसचा बालेकिल्ला. पण, 2014 च्या निवडणुकीत भाजपचे खासदार संजयकाका पाटील ( Sanjaykaka Patil ) यांनी काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावला. गेल्या दहा वर्षांपासून या मतदारसंघातून संजयकाका पाटील लोकसभेचे प्रतिनिधित्व करत आहेत. आता पुन्हा लोकसभेच्या निवडणुकीचे वातावरण तापले आहे. काही दिवसांत आचारसंहितादेखील लागणार आहे.

सांगली लोकसभा मतदारसंघात भाजपमधील गटबाजी व खासदारांच्या कारभाराविरोधात असलेल्या नाराजीच्या लाटेवर विशाल पाटील ( Vishal Patil ) काँग्रेसकडून स्वार होत असताना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

शिवसेनेने सांगलीतून चंद्रहार पाटील ( Chandrahar Patil ) यांच्या उमेदवारीची घोषणा केली. काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम, विशाल पाटील यांनी महाविकास आघाडीच्या एका नेत्यावर याचे खापर फोडले. काँग्रेसला ही जागा जर मिळाली नाही तर विशाल पाटील काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.