सांगलीसाठी कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला

सांगली पाटबंधारे विभागाकडून सिंचनाची मागणी वाढल्यामुळे काल (शुक्रवार) सायंकाळी सहा वाजता रिव्हर स्लउईस गेटद्वारे होणारा ५०० क्युसेक विसर्ग वाढवून ९०० क्युसेक करण्यात येणार आला आहे.पायथा वीजगृहातून दोन हजार १०० व रिव्हर स्लउईस गेटद्वारे ९०० क्युसेक असा एकूण तीन हजार क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात करण्यात येत आहे.कोयना धरण पायथा विद्युतगृहाचे दोन्ही युनिट सुरू असून, त्याद्वारे २१०० क्युसेक विसर्ग गेली अनेक दिवस सुरू आहे.

मात्र, उन्हाची तीव्रता वाढत चालली असून, पूर्वेकडे सिंचन व पिण्याच्या पाण्याची मागणी वाढली आहे, त्यामुळे नऊ नऊ मार्चला सांगली पाटबंधारे विभागाकडून सिंचनाची मागणी वाढल्यामुळे दुपारी चार वाजता कोयना धरणाचे रिव्हर स्लउईस गेट उघडून कोयना नदीमध्ये ५०० क्युसेक विसर्ग सोडण्यात आला होता.त्या वेळी कोयना नदीमध्ये एकूण २६०० क्युसेक विसर्ग सोडण्यात येत होता. आज पुन्हा मागणी वाढल्याने रिव्हर स्लउईस गेटमधील विसर्ग ४०० क्युसेकने वाढवला असून, नदीपात्रात तीन हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे.