मोठी खळबळ! मंगळवेढ्यातील 24 गावांतील शेतकऱ्यांना….

कायम दुष्काळी असणाऱ्या मंगळवेढा तालुक्यातील 24 गावांनी अलमट्टीच्या पाण्यासाठी कर्नाटकमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आणि त्याला आता कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनीही प्रतिसाद दिल्याचं दिसून येतंय.कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी थेट भेटीची वेळ दिल्याने या गावातील ग्रामस्थ 24 गाड्या घेऊन बंगळुरूकडे रवाना होणार आहेत. यामुळे लोकसभा निवडणुकीपूर्वी मोठी खळबळ उडाली असून शिंदे फडणवीस सरकारसाठी हा धक्का मानला जातोय.

कर्नाटक महाराष्ट्र सीमा प्रश्नावर गेले अनेक वर्षे राजकारण सुरु असताना महाराष्ट्रातील या 24 गावांनी थेट कर्नाटकाला जोडण्याची मागणी केल्यावर राज्य सरकारला जाग येणे अपेक्षित होते. मात्र या 24 गावांनी ग्राम ठराव करून शासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला होता.कर्नाटक सरकारच्या अलमट्टी धरणाचे पाणी मंगळवेढा तालुक्याच्या बॉर्डरवर आल्याने आम्हाला अलमट्टीच्या पाण्याची शाश्वती वाटते अशी भूमिका या गावांनी घेतली आहे.

कर्नाटक सीमेपासून अगदी कमी अंतराचे कॅनॉल काढून या 24 गावांचा पाण्याचा प्रश्न हातोहात सुटू शकणार असल्याने या गावांनी आता जगण्यासाठी कर्नाटक बरे अशी ठाम भूमिका घेतली आहे.गुरुवारी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या काय आश्वासन देतात त्यावर या 24 गावांचा निर्णय अवलंबून असणार आहे.