सामाजिक बांधिलकीच्या दृ.िष्टकोनातून इचलकरंजी येथील मेडिकल असोसिएशन ऑफ इचलकरंजी, माई आधार केंद्र, रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल यांच्या वतीने एचआयव्ही, पॉझिटिव्ह व्यक्तींसाठी सर्वधर्मीय वधू-वर परिचय मेळावा होणार आहे.
मेळावा रविवारी (ता. १७) सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत टी. बी. क्लिनिक कल्याण केंद्र येथे होणार आहे, अशी माहिती माई आधार केंद्राचे इन्चार्ज डॉ. ए. के. चौगुले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
इचलकरंजी माई आधार केंद्रात १९९७ पासून आजअखेर एचआयव्ही पॉझिटिव्ह साडेतीन हजारहून अधिक रुग्णांची नोंद आहेत. त्यापैकी ५०० वर रुग्ण हे ए. आर. टी. औषधोपचारावर असून, त्यांना सवलतीच्या दरात औषधे दिली जातात.
इच्छुकांनी १५ मार्चपर्यंत दोन रंगीत फोटोसह नोंदणी करणे आवश्यक आहे. इच्छुकांकडे एचआयव्ही व सीडी चारचा सहा महिन्यांचे आतील रिपोर्ट असणे आवश्यक आहे. मेळाव्यात नावनोंदणीसाठी माई आधार केंद्र कार्यालय येथे संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.