महूद येथील माणगंगा परिवार अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या शाखेचे उद्घाटन संपन्न! आ. बाबासाहेब देशमुख यांची उपस्थिती

माणगंगा परिवार अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या महूद येथील चौथ्या शाखेचे उद्घाटन हे उत्साहात पार पडले. अल्पावधीतच गती घेत ही संस्था म्हणून सर्वांच्याच ओळखीची आहे. सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी या उद्घाटन सोहळ्यामध्ये अध्यक्ष म्हणून उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली. तसेच सांगोला विधानसभेचे माजी आमदार श्री शहाजीबापू पाटील यांच्या सुविद्य पत्नी सौ. रेखाताई पाटील देखील यावेळी उपस्थित होत्या.

या संस्थेने सभासदांनी दाखवलेल्या विश्वासामुळे संख्या कमी कालावधीतच जवळजवळ शंभर कोटींचा व्यवसाय पूर्ण करण्यात यशस्वी ठरलेली आहे आणि मार्च 2025 अखेर हा व्यवसाय दीडशे कोटींचा टप्पा पार करेल असा विश्वास देखील या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. नितीन (आबासाहेब) इंगोले यांनी व्यक्त केला.