माननीय आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

आमदार प्रकाश आवाडे यांना सहकारमहर्षी कल्लाप्पाण्णा आवडे (दादा) यांचा समर्थ वारसा मिळाला. सतत शहराच्‍या विकासाचा ध्यास घेतलेले, दूरदृष्टी असलेले नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.

शहरात आजही शेकडो विकासकामांच्या मंजुरीचा धडाका कायम आहे. वरील विवेचनावरून त्यांच्या कार्याचा आलेख पाहता असा जाणकार व लोकप्रिय आमदार इचलकरंजी शहराला लाभणे हे इचलकरंजी शहरवासीयांचे भाग्यच म्हणावे लागेल. १९८५ मध्ये प्रथम आमदार झाल्यापासून इचलकरंजीनगरीचा मुख्य व्यवसाय असलेल्या वस्त्रोद्योगाच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला.

सत्तारूढ पक्षाचे आमदार असूनही यंत्रमाग व्यवसायाच्या प्रश्नासंदर्भात उपोषण करून प्रश्नाला वाचा फोडली. तेव्हापासून आजअखेर वस्त्रोद्योग व शहराचा सर्वांगीण विकास होण्यासाठी प्रकाशआण्णांनी सातत्याने प्रयत्न करून त्यात यशही मिळवून दिलेले आहे. प्रकाशआण्णांना १९८८ व ८९ मध्ये महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात सहकार व वस्त्रोद्योग राज्यमंत्री म्हणून राज्य स्तरावर काम करण्याची संधी मिळाली.

याकाळात त्यांनी वस्त्रोद्योगाच्या बरोबरीनेच शहराच्या विकासासाठी प्रयत्न केले. यातूनच कृष्णा पाणी योजना अंमलात आली. १९९५ ते ९९ या काळात विरोधी पक्षात असूनही इचलकरंजीच्या यंत्रमागाच्या वीज बिलासंदर्भात विधानसभेत आवाज उठवून वीज बिलात सवलत मिळवून दिली.

त्याचबरोबर २००४ व २००५ मध्ये इचलकरंजी शहरासाठी केंद्र सरकार पुरस्कृत टेक्सटाईल क्लस्टर योजना मंजूर करून आणली व त्याची अंमलबजवणी केली. याकाळात इचलकरंजीतील सर्वांगीण विकास होण्यास मदत झाली.

वस्त्रोद्योग व्यवसायाचे अभ्यासू जाणकार तसेच यंत्रमागधारकांच्या समस्यांच्या तळाशी जाऊन त्या समस्यांचे निराकरण करण्याचे काम केले व अजूनही चालू आहे. २०१९ मध्ये अपक्ष आमदार म्हणून निवडून आले. या दिवसापासून आजपावेतो त्यांनी इचलकरंजी शहराचा विकास व वस्त्रोद्योगातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत व करीत आहेत.