इचलकरंजी : सायझिंग उद्योग आंदोलनाबाबत उद्या मुंबईत तोडगा बैठक

इचलकरंजी शहरातील सायझिंग उद्योग दुसऱ्या दिवशीही बंद राहिल्यामुळे वस्त्रोद्योगातील धगधग वाढली असून संपावर तोडगा कधी निघणार याबाबत वस्त्रोद्योगातील सर्वच घटक चिंतेत आहे.प्रदूषण नियंत्रण मंडळाने इचलकरंजी शहरातील विद्युत पुरवठा खंडित केल्याच्या निषेधार्थ शहरातील उद्योग बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सदर आंदोलनाचा आज दुसरा दिवस होता. दुसऱ्या दिवशी घरातील सर्वच सायझींग उद्योग बंद राहिला होता.

सदर उद्योगाबाबत कधी निघणार याची चिंता सर्वच घटकांना लागला आहे. सदर आंदोलनाबाबत थोडक्यात निघाला नाही तर शहरातील वस्त्रोद्योग ठप्प होण्याची भीती जाणकारातून व्यक्त करण्यात येत असून प्रदूषण मंडळांस शहरातील लोकप्रतिनिधींनी या प्रश्न लक्ष घालून सदरच्या आंदोलनाचा गुंता त्वरित सोडवावा अशी मागणी वस्त्रोद्योगातील सर्वच घटकातून होत आहे.

हळूहळू या आंदोलनाचा फटका वस्त्र उद्योगातील इतर घटकांना जाणवू लागला आहे दरम्यान सदर आंदोलनाबाबतची प्रदूषण महामंडळाची मुंबईचे सचिव सदस्य सचिव यांनी सोमवारी मुंबई येथे बैठकीचे आयोजन केले असून सदर बैठकीमध्ये कोणता तोडगा निघतो याबाबत शहरवासी यांचे लक्ष लागून राहिले आहे.