मुंबईचं आव्हान संपलं! आरसीबी दिल्ली फायनलमध्ये…..

स्मृती मंधानाच्या नेतृत्वातील आरसीबीनं फायनलमध्ये धडक मारली आहे. एलिमेटनरच्या सामन्यात आरसीबीनं हरमनप्रीत कौरच्या मुंबईचा पाच धावांनी पराभव केला. रविवारी दिल्लीच्या मैदानावर आरसीबी आणि दिल्ली यांच्यामध्ये सामना रंगणार आहे. अटीतटीच्या सामन्यात आज आरसीबीनं मुंबईचा पराभव केला. अखेरच्या चेंडूपर्यंत हा सामना रंगला होता. 

आरसीबीनं मुंबईपुढे विजयासाठी 136 धावांचे आव्हान ठेवलं होतं. पण मुंबईचा संघ निर्धारित 20 षटकात 6 विकेटच्या मोबदल्यात 130 धावांपर्यंतच मजल मारु शकला. अखेरच्या तीन षटकात आरसीबीने सामना फिरवला. या विजयासह आरसीबीने फायनलमध्ये प्रवेश केला आहे.