भारत विरुद्ध इंग्लंड टेस्ट सीरिजमध्ये भारताला इंग्लंडची बरोबरी साधायची असेल तर त्यांना काहीही करून मँचेस्टरमध्ये होणारा चौथा टेस्ट सामना जिंकावा लागणार आहे. परंतू या सामन्यापूर्वी टीम इंडियाला (Team India) दुखापतीचं ग्रहण लागलं असून संघातील एक स्टार खेळाडू थेट संपूर्ण सीरिजमधूनच बाहेर पडलाय. यापूर्वी अर्शदीप सिंह आणि आकाश दीप यांच्या दुखापतीबाबत चिंता व्यक्त केली जात होती. मात्र आता सलग तिसऱ्या दिवशी अजून एका खेळाडूच्या दुखापतीच्या बातमीने टीम इंडियावरचं टेन्शन वाढलंय.
ईएसपीएन क्रिकइंफोच्या एका रिपोर्टनुसार भारतीय ऑलराउंडर नितीश कुमार रेड्डी हा दुखापतीमुळे संपूर्ण सीरिजमधून बाहेर पडला आहे. नितीश गुडघ्याच्या दुखापतीमुळे सीरिजमधून बाहेर पडला असून ही दुखापत त्याला सरावादरम्यान झाली. त्याचा स्कॅन काढण्यात आला तेव्हा लिगामेंट इंजुरीबाबत समजलं. ज्यामुळे तो सीरिजमधील उर्वरित दोन सामने खेळू शकणार नाही.
नितीश कुमार रेड्डी दुसऱ्या आणि तिसऱ्या टेस्टमध्ये प्लेईंग 11 चा भाग होता. बर्मिंघम टेस्टमध्ये त्याचा परफॉर्मन्स खास ठरला नाही तो यात फक्त 2 धावा करून बाद झाला. त्याला या सामन्यात विकेट सुद्धा मिळाली नव्हती. परंतु लॉर्ड्समध्ये त्याची फलंदाजी आणि गोलंदाजी उत्तम झाली आणि यत्यंने 3 विकेट घेतले तर 43 धावा सुद्धा केल्या होत्या. आता नितीश कुमार रेड्डी सीरिजमधून बाहेर पडल्यावर त्याच्या जागी कोणत्या खेळाडूला संधी दिली जाते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
