१५ व १६ मार्च रोजी जन्मास येणा-या मुलींच्या नांवे २५००/ ठेवीचा संकल्प!

आमदार प्रकाश आवाडे यांच्या ७१ व्या वाढदिवसानिमित्त आण्णा कावतील मंडळ यांच्यावतीने दि. १५ व १६ मार्च रोजी जन्मास येणा-या मुलींची नांवे रुपये २५००/- ठेव पावती ठेवण्याचा संकल्प झाला.

इचलकरंजीमधील गावभाग येथील आण्णा कावतील ग्रुप यांच्यावतीने आमदार प्रकाश आवाडे यांच्या ७१ व्या वाढदिवसाचे औचित्य साधत व स्व. इंदुमती कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या ९१ व्या जयंतीनिमित्त दिनांक १५ व १६ मार्च २०२४ रोजी इचलकरंजीमधील रहिवाशी असणा-या १५ व १६ मार्च रोजी जन्मास येणा-या कन्याचे नांवे ’स्व. इंदुमती कल्लाप्पाण्णा आवाडे कन्यारत्न ठेव पावती’ ठेवण्यात येणार असल्याचे मंडळाचे अध्यक्ष संजय जगताप यांनी जाहिर केले आहे.

१५ व १६ मार्च २०२४ रोजी जन्म घेणा-या मुलीच्या नांवे ही ठेव पावती ठेवण्यात येणार असून योग्य त्या कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर ही ठेवपावती पालकांच्या स्वाधीन करण्यात येणार आहे. इचलकरंजीतील सर्व हॉस्पीटल किंवा आरोग्य केंद्र आहेत त्यांच्याशी संपर्क साधून मुलींच्या जन्माची नोंद घेण्यात येणार असल्याचे सांगितले.