इचलकरंजीत २० किलो प्लास्टीक जप्त!

इचलकरंजीत शहरातील वार्ड नंबर पाच मध्ये महास्वच्छता अभियान राबवण्यात आले गांधी पुतळा ते जनता बँक तसेच मराठा चौक, शॉपिंग सेंटर शिवाजी उद्यान परिसरा मध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने महास्वच्छता अभियाना अंतर्गत शुक्रवारी राबवलेल्या स्वच्छता मोहिमे दरम्यान बंदी असलेले प्लास्टिकच्या पिशव्या वापरणाऱ्या व्यापाऱ्यांकडून १३ हजार ८६० रुपये दंड वसूल करण्यात आला.

यामध्ये २० किलो प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या आहेत. शहरातील वार्ड नंबर पाच मध्ये सदरचे अभियान राबविण्यात आले.या मोहिमेदरम्यान परिसरातील व्यापारी कायद्याने बंदी असलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या वापरत असल्याचे आढळल्याने तेथील व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करून त्यांच्याकडून १३ हजार ८६० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तर २० किलो प्लास्टिकच्या पिशव्या ही जप्त करण्यात आले आहेत.