लोकसभा निवडणूक 2024 चा बिगुल वाजलय. पहिल्या टप्प्यातील 102 लोकसभा जागांसाठी अधिसूचना जारी झाली आहे. उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, उत्तराखंडसह 21 राज्यातील लोकसभेच्या 102 जागांसाठी उमेदवार आजपासून अर्ज दाखल करु शकतात. ईशान्येकडच्या सहा राज्यात लोकसभेच्या 9 जागा आहेत. दक्षिण भारतात तामिळनाडूमध्ये 39 आणि लक्षद्वीपच्या एका जागेसाठी पहिल्या टप्प्यात निवडणूक होईल.
पहिल्या टप्प्यात 21 राज्य आणि केंद्र शासित प्रदेशात 19 एप्रिलला मतदान होणार आहे.बिहारमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 28 मार्च आहे. त्याशिवाय 20 राज्यात 27 मार्चपर्यंत निवडणूक अर्ज दाखल करु शकता. अर्ज मागे घेण्याची तारीख 30 मार्च आहे. बिहारमध्ये दोन एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येईल. 19 एप्रिलला सर्व 102 लोकसभा सीटसाठी एकत्र मतदान होईल.
निकाल 4 जूनला येतील.पहिल्या टप्प्यात अरुणाचल प्रदेशच्या 2, बिहारच्या 4, आसामच्या 4, छत्तीसगडच 1, मध्य प्रदेशची 6, महाराष्ट्राच्या 7, मणिपुरच्या 2, मेघालयच्या 2, मिजोरमची 1, नागालँडची 1, राजस्थानच्या 12, सिक्किमची एक, तमिलनाडूच्या 39, त्रिपुराची एक, उत्तर प्रदेशच्या 8, उत्तराखंडच्या 5, पश्चिम बंगालच्या 3, अंदमान एंड निकोबारची 1, जम्मू-कश्मीरची 1, लक्षद्वीप 1 आणि पुडुचेरी 1 लोकसभा जागेसाठी मतदान होणार आहे.