एअर इंडियाचं विमान क्रॅश, दुर्घटनेत गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी जखमी

अहमदाबादमधून लंडनला जाणारं एअर इंडियाचं विमान कोसळलं आहे. अहमदाबादवरुन जाणाऱ्या या विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या अपघातात ते जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. हे विमान रहिवाशी भागात कोसळल्याची माहिती मिळत आहे. विमान २४२ प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मेघानी भागात विमान कोसळल असून धुराचे लोट परिसरात पसरले आहेत.

AI 171 हे अपघात झालेल्या विमानाचा क्रमांक आहे. या प्रवास 242 प्रवासी असल्याच सांगितलं जात आहे. गुरुवारी गुजरातमधील अहमदाबाद येथे एअर इंडियाचे प्रवासी विमान बोईंग ड्रीमलायनर ७८७ कोसळले, ज्याचे भयानक फोटो समोर येत आहेत. अहमदाबादच्या मेघानीनगर भागात आगीच्या प्रचंड ज्वाळा दिसल्या. त्याच वेळी दूरवरून काळ्या धुराचे लोट दिसू लागले. या विमानात २४२ प्रवासी होते. हे ड्रीमलायनर बोईंग ७८७ लंडनला जात होते. अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण घेत असताना जवळच्या इमारतीला किंवा भिंतीला धडकल्याने विमान कोसळले.

सर्वत्र गोंधळाचे वातावरण आहे, हा भीषण अपघात पाहून लोक घाबरले आहेत आणि इकडे तिकडे धावत आहेत. विमान पूर्णपणे खराब झाले आहे. विमानाचा बहुतांश भाग जळून खाक झाला आहे. ज्या इमारतीवरून विमान पडले त्या इमारतीचेही नुकसान झाले आहे. सिव्हिल हॉस्पिटलमधील सर्व डॉक्टरांच्या रजा रद्द करण्यात आल्या आहेत विमानतळाजवळ एक सिव्हिल हॉस्पिटल आहे, जिथे सर्व डॉक्टरांच्या रजा रद्द करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, अहमदाबादहून उड्डाण केलेले हे विमान लंडनच्या दिशेने जात होते.