इस्लामपूर शहरातील पार्किंग व्यवस्था कोलमडली आहे. इस्लामपूर शहरातील वेगवेगळ्या चौकामध्ये वाहतूक कोंडीचा प्रश्न खूपच गंभीर बनलेला आहे. लिपारे कॉर्नर ते आझाद चौकादरम्यान गर्दी झाल्याने वाहतूक कोंडी खूपच मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे परिसरात कायदेशीर असलेली मध्य विक्री केंद्र हलवावीत अशी मागणी महिला वर्गातून जोर देत आहे. तहसील कार्यालयासमोर पार्किंग व्यवस्थेची सोय नसल्यामुळे मुख्य चौकातच लावलेली वाहने ही वाहतूक कोंडीला अडसर ठरत आहेत.
बहे रस्त्यावरच भाजीपाला तसेच फळ विक्रेते असतात आणि त्यामुळे देखील वाहतूक कोंडी ही खूपच डोकेदुखीचे कारण बनले आहे. तसेच रस्त्यावर आणि विविध प्रकारचे साहित्य विक्री करणारे व्यापारी देखील मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. तसेच महिलांसाठी असणाऱ्या दुकानांची देखील या ठिकाणी रेलचेल आहे. तसेच महिलांचे प्रसूती रुग्णालय देखील आहे.
त्यातच मध्य विक्रीची दुकाने आणि या दुकानांमध्ये नेहमीच गर्दी देखील पाहायला मिळते त्यातच दुचाकी दुतर्फा लावलेले असतात आणि रस्ता अरुंद असल्यामुळे वाहतूक कोंडी ही सर्वसामान्यांच्या जीवावर बेतली आहे. त्यामुळे शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेली कायदेशीर मद्यविक्री दुकाने इतरत्र हलवावीत अशी माजी नगरसेविका सुप्रिया पाटील यांची अपेक्षा आहे.