राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा सातत्याने होऊ लागताच आपण कोणत्याही स्थितीत पक्ष सोडून अन्य पक्षात जाणार नसल्याचे सांगून या वावड्या थोपविण्याचे प्रयत्न केले असले तरी त्यांच्याबाबत असलेले संशयाचे धुके मात्र विरळ होतांना दिसत नाही.इस्लामपूरच्या तरुण नेतृत्वाला राजकीय संधी आता मिळाली नाही तर भविष्यात आणखी स्थिती कठीणच होणार असल्याची जाणीव आमदार पाटील यांना आहे.
त्याच्या वयाचे आरआर आबांचे पुत्र रोहित पाटील विधानसभेच्या निवडणुकीत राज्य पातळीवरील राजकारणात सक्रिय होणार आहेत. याचबरोबर विट्याचे आमदार पुत्र सुहास बाबरही उंबरठ्यावर आहेत. यामुळे जर आता संधी सोडली तर राज्याच्या राजकीय व्यासपीठावर प्रतिक पाटील मागे राहण्याचा धोका आहे.
यामुळे प्रतिक पाटील यांच्यासाठी इस्लामपूर विधानसभा सोडायची म्हटले तर मुख्यमंत्रीपदाच्या स्वप्नाचे काय होणार याचीही चिंता त्यांना सतावणार आहेच. म्हणजेच एकंदरित आमदार पाटील यांची दुहेरी कोंडी सध्या झाल्याचे दिसत आहे.