सध्या सर्वत्र पाणीपट्टी, घरपट्टी वसुली मोहीम अनेक भागात काटेकोरपणे वसुली सुरु आहे. अनेक भागातील या वसुलीसाठी नळ कनेक्शन तोडण्याची देखील मोहीम हाती घेतली आहे. इस्लामपूर नगरपालिकेच्या कर विभागाने कर थकवलेल्या मालमत्ता धारकांविरुद्ध कारवाईचा धडाका लावला आहे. काही दिवसात कर विभागाने २५ हून अधिक नळ कनेक्शन तोडण्याची कारवाई केल्याची माहिती पद्मश्री दाईंगडे यांनी दिली.
यात साडेपाच लाखांची थकीत कर वसुली झाली. त्या म्हणाल्या, थकीत घरपट्टी, पाणीपट्टी आणि गाळाभाडे वसुलीसाठी पथक नेमून कार्यवाही सुरू आहे. दाईंगडे म्हणाल्या, सोमवारी शिवनगर, साईनगर, इंदिरा कॉलनी, कचरेगल्ली, अकबर मोहल्ला, मंत्री कॉलनी, वडर कॉलनी, महावीर चौक, नाथगोसावी गल्ली, कुचीवाले गल्ली कारवाई केली आहे.