विविध रंगांची उधळण करणारा होळी सण भारतात सर्वत्र साजरा केला जातो. या दिवशी सर्व व्यक्ती विविध रंग एकमेकांना लावतात आणि आनंद साजरा करतात.तुम्ही देखील रंगपंचमीला रंगांची उधळण करत असाल.
होळीनिमित्त सध्या बाजारात विविध प्रकारचे रंग आले आहेत. यातील अनेक रंग केमिकलपासून बनवले जातात. असे रंग वापरल्याने आपल्याला त्वचेचे आजार होतात. बरेचदा चेहऱ्याला रंग लावल्यावर तो लवकर निघत नाही. त्यामुळे दुसऱ्या दिवशी घराबाहेर पडताना चांगलीच फजिती होते.
सोशल मीडियावर होळीचे हट्टी रंग चेहऱ्यावरून जावेत यासाठी अनेक टिप्स वाचायला आणि पाहायला मिळतात. मात्र चेहऱ्यावरून हे हट्टी रंग जावेत यासाठी काही उपाय केण्यपेक्षा चांगले आणि नैसर्गिक घरच्या घरी बनवलेले रंग वापरले तर? होळीसाठी घरच्या घरी अगदी सोप्प्या पद्धतीने रंग बनवता येतात.
साहित्य
झेंडूचे फुल, हळद, गुलाबाच्या पाकळ्या, बीट, फूड कलर, नीळ, आरारोट पावडर, नॉर्मल पावडर, पालक
होळीसाठी रंग बनवताना आधी झेंडूचे फुल मिक्सरला बारीक करून घ्या. त्यात थोडे पाणी टाकून फिकट पिवळा रंग तयार होईल. त्यामध्ये आरारोटची पावडर आणि कोणतीही घरातील नॉर्मल पावडर मिस्क करा. हे सर्व मिश्रण एक केल्यावर रंग थोडा सुकवून पुन्हा मिक्सरला बारीक करून घ्या.
गुलाब जल किंवा गुलाबाच्या पाकळ्या पाण्यात भिजवा. त्यांपासून गुलाबसिरप त्यात करून घ्या. पुढे पावडर आणि अरारोटमध्ये रंग तुम्हाला हवा तसा मिक्स करून घा. डार्क आणि फिकट शेड ठेवून तयार होईल लाल आणि गुलाबी रंग.
सफेद कपडे धुतल्यावर ते कडक दिसावेत म्हणून अनेक जण त्यात नीळ टाकतात. हीच निळ तुम्ही आरारोट किंवा पावडरमध्ये मिक्स करून घ्या. रंग सुकल्यावर मिक्सरला बारीक करून घ्या. तयार झाला तुमचा निळा रंग.
तुम्ही यासह पालक मिक्सरला बारीक करून घेऊ शकता. पालकचा ज्यूस आररोट पावडरमध्ये मिक्स करा. सर्व रंग मिक्स करताना आपल्याला त्याची कणीक बनवायची हे लक्षात ठेवा. नॉर्मल रंग मिक्स करून तुम्ही मिक्सरला बारीक करून किंवा चाळणीने चाळून घेऊ शकता.
अशा पद्धतीने रंग बनवण्याल्याने तुमच्या त्वचेला यापासून कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. अगदी लहान मुलं देखील हे रंग आपल्या चेहऱ्याला लावू शकतात. अनेकदा लहान मुलांना रंग खेळताना रंग डोळ्यात किंवा नाका तोंडात देखील जातो. त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने घरच्याघरी रंग बनवल्यास याने लहान मुलाना देखील कुठलाही त्रास होणार नाही.