महाष्ट्रात पुन्हा मोठा राजकीय वाद पेटणार! शिवसेनेच्या नेत्यांना जबदस्त झटका

रायगड आणि नाशिकममध्ये पुन्हा एकदा दादांची राष्ट्रवादी आणि शिंदेंची शिवसेना आमनेसामने येण्याची शक्यता आहे. रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा निर्णय रद्द केला असला तरी स्वातंत्र्य दिनी अदिती तटकरे आणि गिरीश महाजन ध्वजारोहण करणार आहेत. अदिती तटकरे रायगडमध्ये तर गिरीश महाजन नाशिक जिल्ह्यात 15 ऑगस्टला ध्वजारोहण करणार आहेत.

रायगडातील ध्वजारोहणावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी वाद उफाळण्याची शक्यता आहे. रायगडचं पालकमंत्रिपदाला स्थगिती दिल्यानंतरही आतापर्यंत रायगडात ध्वजारोहणाचा मान आदिती तटकरेंना देण्यात आला होता. रायगडात यंदाचा ध्वजारोहणाचा मान भरत गोगावलेंना मिळावा, अशी मागणी होत असताना 15 ऑगस्ट रोजी रायगड जिल्ह्यात मंत्री अदिती तटकरे ध्वजारोहण करणार आहेत. तर, नाशिकमध्ये गिरीश महाजन ध्वजारोहण करणार आहेत. नाशिकममध्ये दादा भुसे यांचे पालमंत्रीपदासाठी चर्चेत आहे. भारताचा 79 वा स्वातंत्र्य दिन समारंभ शुक्रवारी पार पडणार आहे. यासाठी कोणते मंत्री कोणत्या जिल्ह्यांत ध्वजारोहण करणार याची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यात शिवसेनेच्या नेत्यांना डावलण्यात आले आहे.