मनोज जरांगे पाटील अर्धवट दौरा सोडून घरी!

मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांची 24 मार्चला निर्णयाक बैठक होणार आहे. या बैठकीत आंदोलनाची पुढील दिशा ठरवणार असल्याची माहिती मिळत आहे.24 तारखेची अंतिम बैठक आणि ठोस बैठक असेल, सरकारला पश्चातापाची वेळ आणली नाही तर नाव बदलून ठेवीन, असा इशारा देखील जरांगे पाटलांनी सरकारला दिला आहे.

यासाठी तयारी करत असलेले मनोज जरांगे पाटील दौरा अर्धवट सोडून जालन्यातील घरी परतले. याचं कारण आता समोर आलं आहे.मनोज जरांगे पाटील दौरा अर्धवट सोडून अंतरवाली सराटी गावात पोहचले. मुलीची प्रकृती बिघडली म्हणून भेटायला आलो होतो.

तसेच आईचे ऑपरेशन असून भेटायला जाणार असल्याची माहिती मनोज जरांगे पाटील यांनी दिली. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळवून देत नाही. तोपर्यंत घरी परतणार नसल्याची शपथ जरांगे पाटील यांनी घेतली होती. गेलो तर समाजाचा आणि आलो तर तुझा असं मनोज जरांगे पाटील म्हणाले होते.