Shah Rukh Khan : हि आहे शाहरुखची होणारी सून…..

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा लाडका लेक आर्यन खान (Aryan Khan) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. आर्यन खान दिग्दर्शित ‘स्टारडम’ ही वेबसीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सीरिजची एकीकडे चर्चा होत असताना आर्यन वैयक्तिक आयुष्यामुळेदेखील चर्चेत असतो. आर्यन खानचं नाव आतापर्यंत अनन्या पांडे (Ananya Panday), शनाया कपूर (Shanaya Kapoor) या अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं होतं.

आता आर्यन खानचं वैयक्तिक आयुष्य पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. आर्यन खान परदेशी अभिनेत्री आणि मॉडेल लारिसा बोन्सीला (Larissa Bonesi) डेट करत असल्याची सध्या चर्चा आहे.शाहरुख खानचा लाडका लेक आर्यन खान ब्राजीलियन अभिनेत्री लारिसा बोन्सीला डेट करत असल्याची सध्या चांगलीच चर्चा आहे. चाहते नेहमीच त्यांच्या लाडक्या सेलिब्रिटींची एक झलक पाहण्यासाठी उत्सुक असतात. आता एका रेडिट यूझरने आर्यन खान आणि लारिसा बोन्सी यांच्या नात्यावर भाष्य केलं आहे.लारिसा बोन्सी एक ब्राजीलियन मॉडेल आणि डान्सर आहे.

गो गोवा गॉन आणि देसी बॉईज सारख्या चित्रपटांत लारिसा बोन्सीने काम केलं आहे. तसेच अक्षय कुमार आणि जॉन अब्राहमसोबत ‘सुबह होने न दे’ या ब्लॉकबस्टर गाण्यातही लारिसा दिसून आली होती. टायगर श्रॉफ आणि सूरज पंचोली यांच्या काही म्युझिक व्हिडीओ अल्बमध्येही ती दिसून आली आहे. दाक्षिणात्य मनोरंजनसृष्टीतही तिने काम केलं आहे. टॉलिवूडच्या ‘नेक्स्ट एनी’ आणि ‘थिक्का’ सारख्या चित्रपटांत लारिसाने काम केलं आहे. 

आर्यन खान लारिसाच्या संपूर्ण कुटुंबियांना फॉलो करतो. आर्यनने लारिसाच्या आईला वाढदिवशी खास भेट दिली होती. लारिसा परदेशातील उत्कृष्ट अभिनेत्री आहे. गुरू रंधावा यांच्या ‘सूरमा सूरमा’ म्युझिक व्हिडीओ, स्टेबिन बेनचे म्युझिक व्हिडीओ आणि विशाल मिश्रासोबतही लारिसा दिसून आली आहे. तसेच बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) ‘देसी बॉयज’मध्येही ती दिसून आली आहे.