थिएटरनंतर ओटीटीवर हे चित्रपट घालणार धुमाकूळ! वाचा कुठे पाहायला मिळणार?

ओटीटी थिएटरनंतर ओटीटीवर हे चित्रपट घालणार धुमाकूळ! वाचा कुठे पाहायला मिळणार? प्लॅटफॉर्मवर दर आठवड्यात सिनेमे आणि वेबसीरिज प्रदर्शित होत असतात. नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडीओ आणि डिज्नी प्लस हॉटस्टार यांसारख्या ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मवर प्रेक्षक वेगवेगळ्या विषयांवर आधारित असणारे चित्रपट आणि वेब सीरिज पाहू शकतात.काही सिनेमे हे थेट ओटीटीवर रीलिज केले जातात.

तर काही सिनेमे हे थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर काही दिवसांनी ओटीटीवर रीलिज होतात. अभिनेता अजय देवगनचा ‘सिंघम अगेन’, रणवीर सिंगचा ‘डॉन 3’ आणि श्रद्धा कपूरचा ‘स्त्री 2’ हे सिनेमे थिएटरनंतर कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रीलिज होणार हे आपण जाणून घेऊया.

‘सिंघम अगेन’, ‘डॉन 3’ आणि ‘स्त्री 2’ या तिन्ही सिनेमांची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या सिनेमांचा मोठा चाहतावर्ग आहे. हे तिन्ही सिनेमे लवकरच थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहेत. ‘सिंघम अगेन’ चित्रपट 15 ऑगस्ट 2024 ला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अजय देवगण पु्न्हा एकदा बाजीराव सिंघमच्या मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

तर राजकुमार राव आणि अभिनेत्री श्रद्धा कपूरचा ‘स्त्री 2’हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘स्त्री’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्याने ते ‘स्त्री 2’ या सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत.

तर अमिताभ बच्चन, शाहरुख खाननंतर आता रणवीर सिंग हा सुपरहिट फ्रँचायझी ‘डॉन 3’ पुढे नेणार आहे. रणवीर सिंग आणि कियारा अडवाणी हे ‘डॉन 3’मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. फरहान अख्तर दिग्दर्शित डॉन 3 2025 मध्ये रिलीज होण्याची शक्यता आहे. हे तिन्ही चित्रपट थिएटरमध्ये रीलिज झाल्यानंतर प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रीलिज होणार आहेत. याची घोषणा नुकतेच प्राइम व्हिडीओनं केली आहे.