दिल्ली-एनसीआरमध्ये आज (दि.११) दुपारी भूकंपाचे धक्के जाणवले. धक्के जाणवताच घरातील लोक आणि कार्यालयात काम करणारे कर्मचारी बाहेर पडले, या संदर्भातील वृत्त एएनआयने दिले आहे.गुरुवारी दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपामुळे पुन्हा एकदा पृथ्वी हादरली. भूकंपाचे हे धक्के बराच वेळ जाणवत होते.
भूकंपाचे धक्के जाणवताच लोक घरातून आणि कार्यालयातून बाहेर आले. सध्या कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.
या भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तानातील फैजाबाद येथे होता आणि हिंदुकुश भागात त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.2 इतकी होती. याशिवाय जम्मू-काश्मीरमधील पूंछ जिल्ह्यातील पीर पांचाळ परिसरात दक्षिणेलाही भूकंपाचे धक्के जाणवले.
