भाजपाच्या बांधणीचा फायदा धैर्यशील माने यांच्या माथ्यावर पडणार…

मागील विधानसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यानंतर प्रकाश आवाडे यांनी इचलकरंजी विधानसभा निवडणुकीचे मैदान मारले, त्यानंतर भाजपसोबत मैत्रीपूर्ण संबंध ठेवले.भाजपचे माजी आमदार सुजित हळवणकर यांनी केलेली पक्षाची बांधणी, आमदार प्रकाश आवाडे यांचे मताधिक्य हेच महायुतीचे बलस्थान आहे. मागील लोकसभा निवडणुकीत इचलकरंजी विधानसभा क्षेत्रातून सर्वाधिक मताधिक्य धैर्यशील माने यांना मिळाले होते. ते टिकविण्याचे आव्हान माने यांच्यासमोर आहे.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या बांधणीचा फायदा माने यांना मिळू शकतो. मात्र, महायुतीची उमेदवारी कोणाला मिळणार यावर अवलंबून आहे. जर हीं जागा भाजपला गेल्यास आमदार प्रकाश आवाडे यांचे पुत्र राहुल आवाडे, गोकुळ संचालिका शौमिका महाडिक हे देखील रिंगणात उतरण्याची चर्चा होती. तर राजू शेट्टी यांच्यासमोर इचलकरंजीतून जास्तीत जास्त मते घेण्याचे आव्हान असणार आहे.