सिलेक्शन होऊनही ३ खेळाडूंना प्लेइंग ११ मध्ये मिळणार नाही स्थान

आशिया कप 2025 साठी बीसीसीआयकडून मंगळवारी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली. चीफ सिलेक्टर अजित आगरकर आणि कर्णधार सूर्यकुमार यादव यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या पत्रकार परिषदेत 15 खेळाडूंच्या संघाची घोषणा करण्यात आली. पण या 15 खेळाडूंपैकी केवळ 11 खेळाडूच मैदानात उतरतील. तेव्हा यापैकी असे 3 खेळाडू आहेत ज्यांना आशिया कप 2025 च्या प्लेईंग 11 (playing 11) मध्ये खेळण्याची संधी मिळणं अवघड आहे, त्यामुळे या खेळाडूंना कदाचित संपूर्ण स्पर्धा बेंचवरच बसावे लागेल.

संजू सॅमसनला प्लेईंग 11 मध्ये संधी मिळण्याची शक्यता कमी आहे याबाबत स्वतः चीफ सिलेक्टर अजित आगरकर यांनी पत्रकार परिषदे दरम्यान संकेत दिले. जेव्हा त्यांनी संजू सॅमसनच्या जागी जितेश शर्माचं नाव घेतलं. मागच्या एक वर्षात गिल आणि यशस्वी यांनी टेस्ट क्रिकेटवर लक्ष केंद्रित केल्यामुळेच गेल्या एक वर्षापासून संजूला टी-20 मध्ये संधी मिळत राहिल्याचेही त्यांनी सांगितले.आता शुभमन गिलचा संघात समावेश झाल्यानंतर, तो अभिषेक शर्मासोबत इनिंगची सुरुवात करेल तर जितेश शर्मा विकेटकिपर म्हणून खेळेल असा निर्णय घेण्यात आला आहे.

प्लेईंग 11 तर सोडाच रिंकू सिंहचं नाव तर टीम इंडियात सुद्धा नव्हतं. रिंकू सिंह हा टॅलेंटेड असला तरी तो आशिया कपच्या टीम कॉम्बिनेशनमध्ये तसा फिट बसत नाही. हार्दिक पांड्या आणि अक्षर पटेल सारख्या फिनिशर्समुळे त्याला प्लेईंग 11 मध्ये स्थान मिळणार नसले तरी, त्यामुळे श्रेयस अय्यरच्या जागी रिंकूचा संघात समाविष्ट करावा लागणार होता.

जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंहची जागा प्लेईंग 11 मध्ये निश्चित दिसतेय. अशातच हर्षित राणाला मोठ्या कालावधीनंतर संघात समाविष्ट करण्यात आले. टीम इंडियात हार्दिक पंड्याच्या रूपाने पेसर अटॅकचा ऑप्शन आहे. डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप संघात एक्स फॅक्टर आणतो, त्यामुळे त्याला बाहेर ठेवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही

संयुक्त अरब अमीरात मध्ये 9 सप्टेंबर पासून आशिया कप 2025 ला सुरुवात होणार आहे. यासाठी भारतीय संघाचं सेलेक्शन 19 ऑगस्ट रोजी केलं जाईल. यावर्षी आशिया कप टी20 फॉर्मेटमध्ये खेळवला जाणार असून यात भारताचा पहिला सामना हा 10 सप्टेंबर रोजी संयुक्त अरब अमीरात मध्ये होईल. तर दुसरा सामना हा 14 सप्टेंबर रोजी पाकिस्तानमध्ये होईल. भारताचा तिसरा ग्रुप स्टेज सामना हा 19 सप्टेंबर रोजी ओमानमध्ये होईल. या स्पर्धेची फायनल 28 सप्टेंबर रोजी होईल.

आशिया कप 2025 साठी भारतीय संघ :
सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (विकेटकीपर), जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंह, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, संजू सॅमसन (विकेटकीपर), हर्षित राणा आणि रिंकू सिंह.