सांगोला तालुक्यातील पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची मागणी केल्यानंतर 48 तासाच्या आत पाणीपुरवठ्यासाठी टँकर दिला जाईल, असे आश्वासन आमसभेत देणाऱ्या अधिकाऱ्यांनी तालुक्यातील दहा गावातून टँकरची मागणी होऊनही कित्येक दिवस झाले ,तरी अद्यापही पिण्याच्या पाण्यासाठी टँकरचा पुरवठा केला नाही .अधिकारी ने दिलेले आश्वासन हे नुसतेच पोकळ ठरले आहे .
तालुक्यातील दहा गावांवर जल संकट ओढवले असून संबंधित गावच्या ग्रामपंचायतीने तालुका कार्यालयाकडे टँकर मागणीचा प्रस्ताव दिला आहे. तालुका कार्यालयाकडून प्रांत कार्यालयाकडे प्रस्ताव पाठवल्याचे समजते .परंतु याची तातडीने दखल घेतली जात. नसल्याचे निदर्शनास येत आहे .त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी लोकांना वणवण करावी लागत आहे.