देशात प्रत्येक महिन्यात काहींना काही नवीन नियम लागू होत असतात. अशातच मार्च महिना येत्या काही दिवसात संपणार आहे आणि यामुळे देशात पुन्हा एकदा नवीन महिना म्हणजेच 1 एप्रिलपासून काही नवीन नियम लागू होणार आहे.या नवीन नियमांचा तुमच्या खिशावर काय परिणाम होऊ शकते याची माहिती या लेखात जाणून घ्या. हे लक्षात ठेवा कि, देशात 1 एप्रिलपासून गुंतवणूक योजना, फास्टॅग, पीएफ आणि इतर पैशांशी संबंधित अनेक बदल होणार आहे.
PAN-Aadhaar Link Deadline
यापूर्वी अनेकदा PAN ला आधारशी लिंक करण्याची अंतिम मुदत वाढवण्यात आली आहे. माहितीनुसार, पॅनला आधारशी लिंक करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024 आहे. जर एखाद्या व्यक्तीने या तारखेपर्यंत आपला पॅन आधारशी लिंक केला नाही तर त्याचा पॅन क्रमांक रद्द केला जाईल. यासोबतच, पॅन कार्ड सक्रिय करण्यासाठी उशीरा पेमेंट म्हणून तुम्हाला 1000 रुपये दंड देखील भरावा लागू शकतो.
LPG Cylinder
प्रत्येक महिन्याप्रमाणे, 1 एप्रिल 2024 रोजी एलपीजी सिलेंडरच्या नवीन किमती निश्चित केल्या जातील. मात्र, लोकसभा निवडणुकीची 2024 ची आचारसंहिता सध्या लागू आहे, त्यामुळे किमतीत बदल करण्यास वाव नाही.यामुळे नागरिकांना मार्च महिन्यात असणाऱ्या दरात एप्रिलमध्ये एलपीजी सिलेंडर खरेदी करता येणार आहे.
FASTag चा नवीन नियम
जर तुम्ही तुमच्या कारच्या FASTag चे KYC बँकेकडून अपडेट केले नसेल, तर तुम्हाला 1 एप्रिल 2024 पासून समस्यांना सामोरे जावे लागू शकते. हे काम लवकरात लवकर करा कारण 31 मार्च 2024 नंतर, KYC शिवाय Fastag निष्क्रिय केले जाईल किंवा बँकेद्वारे काळ्या यादीत टाकले जाईल.