पुण्यातील रूबी हॉल क्लिनिकच्यावतीने इंदापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णी येथे गुरुवारी (ता. २८) हृदयरुग्णांसाठी मोफत तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे.
यामध्ये इंदापूर येथील रूबी मेडिकल सर्व्हिसेसमध्ये सकाळी ११ ते दुपारी १ व टेंभुर्णी येथील मार्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे दुपारी १ ते २, तसेच विठाई हॉस्पिटल येथे दुपारी २ ते साडेतीन यावेळेत तपासणी शिबिर होणार आहे.
या शिबिरात पुणे येथील रूबी हॉल क्लिनिकचे हृदयरोगतज्ज्ञ रुग्णांची तपासणी करणार आहेत.छातीत दुखणे, दम लागणे, अस्वस्थ होणे, घाम येणे, गुदमरणे, तसेच रक्तातील साखरेचे प्रमाण कमी किंवा जास्त असणे आदी लक्षणे असलेल्यांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन रूबी हॉल क्लिनिकचे वरिष्ठ व्यवस्थापक संजय लावंड, तसेच इंदापूर येथील रूबी मेडिकल सर्व्हिसेसचे व्यवस्थापक ज्ञानदेव शेंडे यांनी केले.