यमित ऑफिसरप्रमाणेगोल्ड मेडलिस्ट आणि भारतीय खेळाडू नीरज चोप्राला (Neeraj Chopra) आता मोठी जबाबदारी मिळाली आहे. भारतीय सैन्यात नीरजला लेफ्टनंट कर्नल ही पदवी देण्यात आली आहे. नीरजने भाला फेक म्हणजे जेवेलिन थ्रोमध्ये गोल्ड मेडल मिळवले होते. जगातील सर्वोत्तम खेळाडूंमध्ये नीरज याचे नाव घेतले जाते. नीरजने टोक्यो ऑलंपिक 2021 मध्ये गोल्ड आणि पॅरिस ओलंपिक 2024 मध्ये सिल्व्हर पदक मिळवले होते. आता लष्करानेदेखील नीरजला कर्नलपदाची मानद उपाधी देऊन सन्मान केला आहे. नीरज चोप्राला आता या पदासाठी ट्रेनिंग घ्यावे लागणार की नाही? तसंच, सॅलरी आणि सुविधा कशा मिळणार जाणून घेऊयात.
नीरज चोप्राने फक्त खेळातच नव्हे तर सेनासोबत काम करुन अनेक युवकांना प्रेरणादेणारे काम केले आहे. त्याची मानद लेफ्टिनेंट कर्नल ही उपाधी हा याचाच पुरावा आहे. नीरजचा हा प्रवास लाखो युवकांसाठी प्रेरणादायक आहे. नीरज चोप्राने 2021 मध्ये भाला फेकीत 87.58 मीटरभाला फेकत इतिहास रचत गोल्ड मेडल जिंकलं होतं.तर, भारतातील पहिला ट्रॅक अँड फिल्ड अॅथलीड ठरला होता. त्यानंतर नीरजने ऑलंपिकमध्ये व्यक्तिगत गोल्ड मेडलदेखील पटकावले होते. 2024मध्ये पॅरिस ऑलिंपिकमध्ये नीरजने 89.45 मीटर भालाफेक करत सिल्वर मेडल जिंकले होते. त्याच्या या नीरज कामगिरीने दोन मेडल जिंकणारा पाचवी भारतीय खेळाडू ठरला होता. नीरज 2016 मध्ये भारतीय सैन्यात नायब सुभेदार या पदावर भरती झाला होता. त्यानंतर त्याच्या यशाने सुभेदार पदावरुन थेट मेजरपदावर पदोन्नती दिली आहे.
नीरज चोप्राला आर्मीत लेफ्टिनेंट कर्नलची मानद देण्यात आली आहे. याचा अर्थ ही एक सन्मानजनक रँक असते. त्यामुळं नीरज चोप्राला ट्रेनिंग घेण्याची गरज भासणार नाही. मानद रँक मिळालेल्या व्यक्ती जसे की लोकप्रिय खेळाडू किंवा व्यक्ती असतील यांना ट्रेनिंगची गरज भासत नाही. नीरज 2016मध्ये भारतीय सैन्यात नायब सुबेदार म्हणून भरती झाला होता आणि आर्मी स्पोर्ट्स इंस्टीट्यूट (ASI) येथे ट्रेनिंग घेतली होती. पण ही ट्रेनिंग खेळासंबंधी होती. आता नीरज चोप्राची भूमिका युवकांना प्रेरित करणे, सैन्याच्या प्रचारात योगदान देणे आणि कार्यक्रमात सहभागी होणे.
आर्मीमध्ये लेफ्टिमेंट कर्नल या पदावर असताना सातव्या वेतन आयोगाअंतर्गंत सॅलरी आणि सुविधा मिळते. मात्र मानद रँक असलेल्या व्यक्तींना साधारणतः पगार मिळत नाही. कारण ते सेवेत सक्रीय नसतात. मात्र नीरजला जर ट्रेनिंग किंवा विशेष ड्युटीसाठी बोलवण्यात आले तर त्याला नि सॅलरी आणि सुविधा मिळू शकतात. जोपर्यंत अधिकारी ऑन ड्युटी असतात तोपर्यंतच त्यांना पगार मिळतो.