प्रणिती शिंदे यांचं राम सातपुतेंना आव्हान!

सोलापुरात शिवसेना ठाकरे गटाचा पदाधिकारी मेळावा पार पडला. या मेळाव्याला काँग्रेसच्या लोकसभा उमेदवार प्रणिती शिंदे उपस्थित होत्या. प्रणिती शिंदे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं. तेव्हा भाजपवर त्यांनी जोरदार टीका केली. भाजपने 10 वर्षे सोलापुरकरांचा विश्वासघात केला. पण तरीही भाजपने लोकांचा विश्वासघात केला. काँग्रेसकडे आक्रमकता नव्हती. पण शिवसेना आमच्यासोबत आली आहे. आपल्याला भाजपच्या विरोधात लढायचं आहे. त्यांच्या विचारधारेविरोधात लढायचं आहे, असं प्रणिती म्हणाल्या. भाजपचे आमदार आणि सोलापूरचे उमेदवार राम सातपुते यांच्यावरही प्रणिती शिंदे यांनी शाब्दिक हल्ला चढवला आहे.

भाजपचे उमेदवार राम सातपुते यांच्यावर प्रणिती यांनी पुन्हा एकदा टीका केली आहे. तुम्ही माझ्या वडिलांच्या संघर्षाचे सांगता. मात्र बाहेरच्यांनी येऊन आम्हाला पावती द्यायची गरज नाही. तुम्ही कोण लागून गेलात माझ्या वडिलांचा अपमान करायला? मी उमेदवार आहे. माझ्यावर बोला, असं प्रणिती शिंदे म्हणाल्या.

राम सातपुते हे आपल्या खोट्या गरीबीचा दाखला देत म्हणत फिरतात ‘अब राजा का बेटा राजा नहीं बनेगा, जो काबिल है वहीं राजा बनेगा’ मग सोलापुरात केलेल्या लोक हिताच्या कामांबद्दल बोला आणि लोकांना ठरवू द्या कोण काबिल आहे ते…, असं म्हणत प्रणिती शिंदे यांनी राम सातपुते यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

आपला एकच शत्रू आहे तो म्हणजे भाजप… बाळासाहेब ठाकरे आणि शिंदे साहेबांचे संबंध जुने आहेत. बाळासाहेब ठाकरे यांचे भाषण ऐकण्यासाठी आमची आई शिवाजी पार्कवर बाळासाहेबांचे भाषण ऐकायला जायचो. विरोधक सुशीलकुमार शिंदेसाहेब, शरद पवारसाहेब यांच्यावर टीका करत आहेत. मी उमेदवार आहे माझ्यावर टीका करा. माझ्या वडिलावर कशाला टीका करता? हिंमत असेल तर माझ्याशी लढा…, असं आव्हान प्रणिती यांनी दिलं आहे.