भगीरथ भालकेंनी घेतली शरद पवार यांची भेट!विधानसभेच्या निवडणुकीत उतरणार का?

पुढच्या काही महिन्यातच विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या दृष्टीनं सर्वच राजकीय नेत्यांनी हालचाली करण्यास सुरुवात केली आहे. विधानसभा निवडणुका जाहीर होण्याच्या आधी पंढरपुरात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भारत राष्ट्र समिती (BRS) मध्ये प्रवेश केलेले आणि माजी आमदार कै.भारतनाना भालके यांचे पुत्र भगीरथ भालके (Bhagirath Bhalke)यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची बारामतीत भेट घेतली आहे.

भालके हे महविकास आघाडीकडून पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. लोकसभा निवडणुकीत भगीरथ भालके हे महाविकास आघाडीच्या प्रचारात सक्रिय असल्याचे पाहायला मिळाले होते. भगीरथ भालके हे देखील पंढरपूर मंगळवेढा विधानसभेची निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. तशी मोर्चेबांधणी त्यांनी सरु केली आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याचे बोलले जात आहे.