साखर कारखानदारांकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांची काटामारी रोखण्यासाठी येथे आंदोलन अंकुशने उभारलेल्या शेतकरी वजन काट्याची पाहणी मंगळवेढा येथील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने केली.सोलापूर जिल्ह्यातही शेतकरी वजन काटा उभा करण्याचा निर्धार मंगळवेढा येथून आलेल्या शेतकरी शिष्टमंडळाने केला. मंगळवेढा येथील आंदोलन अंकुशने उभा केलेल्या शेतकरी वजन काट्याची चर्चा सर्वदूर पोहोचली आहे.
सोलापूर जिल्ह्यातही शेतकऱ्यांचा त्रयस्थ काटा उभारण्यासाठी मंगळवेढ्यातील वीस शेतकरी आले होते. त्यांनी आंदोलन अंकुशच्या शेतकरी वजन काट्याची माहिती घेतली.आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांनी त्यांना काट्याविषयी व या प्रयोगाच्या यशस्वितेबद्दल माहिती दिली. काटा उभारणीसाठी सर्व ती मदत करण्याचे आश्वासन दिले. दरम्यान, अशाच प्रकारचा प्रयोग येत्या हंगामात काटा उभा करणार असल्याचे या समितीचे प्रमुख संजय कट्टे यांनी जाहीर केले.