कोल्हापुरात अवकाळी पावसाने नागरिकांची तारांबळ!

काल सकाळ पासून वातावरण हे ढगाळ होते. हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तवला होताच. कोल्हापूर जिल्ह्यात व आसपासच्या गावात काल अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली. विजांसह हलक्या पावसाचा काही ठिकाणी अंदाज आहे. सातारा, सांगली या जिल्ह्यांमध्येही काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. सायंकाळी सहाच्या सुमारास शहरात पावसाने हजेरी लावली.अवकाळी पावसाने अचानक हजेरी लावल्याने नागरिकांची तारांबळ उडाली.

कोल्हापूर शहरात ऊसतोड सुरु असल्याने अवकाळी पावसाने अडचण झाली.हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तवला होता.कोल्हापूर जिल्ह्यात ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी विजांसह हलका पाऊस पडू शकतो, असा अंदाज आहे.राज्यातील ढगाळ वातावरणामुळे पावसासाठी पोषक वातावरण झालं आहे.