कबनूर येथील ग्रामदैवत जंदिसाहेब व ब्रॉनसाहेब उरुस समिती यांच्यावतीने उरसानिमित्त गुरुवारी (४ एप्रिल) सकाळी ८ वाजता लहान गट पळण्याच्या शर्यती, ९ वाजता मोठा गट पळण्याच्या शर्यती, ९.३० वाजता सायकल शर्यतीचे आयोजन केले आहे.शुक्रवारी (५ एप्रिल) सकाळी ९ वाजता आदत जनरल गट बैलगाडी शर्यती, ९.३० वाजता जनरल ”ब” गट, जनरल ”अ” गट बैलगाडी शर्यती तसेच दुपारी ४ वाजता निकाली कुस्त्यांचे जंगी मैदानाचे आयोजन केले आहे. शनिवारी (६ एप्रिल) दुपारी ४ वाजता मोटारसायकलबरोबर म्हैस पळवणे शर्यती, रविवारी (७ एप्रिल) दुपारी ४ वाजता शिवशंभू मर्दानी दांडपट्टा मंडळ, कबनूर व जय भवानी व्यायाम मंडळ, इचलकरंजी यांची मैदानी खेळाची प्रात्यक्षिके तसेच दुपारी ४ वाजता निकाली कुस्त्यांचे मैदान होणार आहे. मंगळवार (९ एप्रिल) सकाळी ९ वाजता गावगन्ना बैलगाडी शर्यतीचे आयोजन केले आहे.
Related Posts
इचलकरंजीत डॉ. राहुल आवाडे युवा शक्तीतर्फे आयोजित दहीहंडी शिरोळच्या ‘अजिंक्यतारा’ने फोडली!
डॉ. राहुल आवाडे युवा शक्तीच्या मानाच्या दहीहंडी स्पर्धेत अजिंक्यतारा तरुण मंडळ शिरोळ संघाने बाजी मारली. तब्बल सहा थर लावून दहीहंडी…
जर्मनी गँगच्या टोळक्याने हॉटेल व्यावसायिकाला लुटले
शस्त्रास्त्राचा धाक दाखवून जर्मनी गँगच्या नावाने दहशत माजवत हॉटेल व्यावसायिकाकडे (businessman) चार हजार रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी सहाजणांवर शिवाजीनगर पोलिसात…
मँचेस्टरनगरीची नवीन ओळख ‘एम.एच. ५१..
महाराष्ट्राचे मँचेस्टर आणि कबड्डी-खोखोची पंढरी म्हणून ओळखल्या जाणार्या वस्त्रनगरी इचलकरंजीची आता ‘एमएच 51’ अशी आणखी एक नवीन ओळख झाली आहे.…