तुम्हीही सरकारी नोकरीच्या शोधात आहात तर वेळ न घालवता लगेचच अर्ज करा. महाराष्ट्र राज्य पोलीस दलात सध्या बंपर भरती सुरु आहे. या भरती अंतर्गत 17471 विविध पदांवर भरती करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य पोलीस दलात हवालदार आणि ड्रायव्हर पदांवर भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवाराने mahapolice.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन अर्ज दाखल करावा लागेल.
- अर्ज प्रक्रिया सुरु झाल्याची तारीख : 5 मार्च 2024
- अर्ज करण्याची अंतिम तारीख : 15 एप्रिल 2024
- रिक्त पदांची संख्या : 17471
रिक्त पदे : महाराष्ट्र राज्य पोलीस दलात पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक, सशस्त्र पोलीस शिपाई, कारागृह शिपाई आणि बॅन्डसमन पदांवर भरती करण्यात येणार आहे.
वयाची अट: अर्ज दाखल करण्याऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 28 या दरम्यान असावे.
अर्जाची फ़ी: अर्ज करण्यासाठी तुम्हाला 450 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. तर मागासवर्गातील उमेदवाराला अर्ज शुल्कात 100 रुपये सूट मिळेल, त्यामुळे 350 रुपये अर्जाची शुल्क भरावे लागेल.
पात्रता : बारावी उत्तीर्ण असणे किंवा त्या समकक्ष पदवी प्राप्त करणे आवश्यक आहे.
अधिकृत वेबसाईट : mahapolice.gov.in