आनंदाचा शिधा मिळणार नाही, आचारसंहितेमुळे वाटपास प्रतिबंध

रेशनकार्ड धारकांसाठी मोठी बातमी आहे. राज्य मंत्रिमंडळाने 11 मार्च रोजी गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त‘आनंदाचा शिधा’ वितरण करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु आता आनंदाचा शिधा मिळणार नाही. शिधावाटप दोन महिने बंद राहणार आहे.
दीड वर्षाच्या कालावधीत राज्य सरकारने १०० रुपये दर आकारून एक किलो साखर, अर्धा किलो रवा, मैदा, एक किलो तेल, चणाडाळ या वस्तूंचा संच तयार करून तो शिधावाटप दुकानातून लाभार्थींना सणाच्या काळात वाटप केला जात होता.

आता होळी, गुढीपाडवा उंबरठ्यावर येऊन ठेपले आहेत. आता आचारसंहिता लागू असल्याने निवडणूक आयोगाच्या आदेशावरून लाभार्थींना शिधावाटप दुकानातून देण्यात येणारे वस्तूंचे संच आचारसंहिता संपेपर्यंत म्हणजेच ७ जून पर्यंत वाटप न करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.