मोची समाजातील युवकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत यासाठी आमदार सातपुते यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवाद साधला. संवादा दरम्यान सातपुतेंनी फोन स्पिकरवर टाकला.या संवादाचे व्हिडिओ सोशल मिडियात व्हायरल झाला. एमएलए विजय देशमुख नावाच्या एक्स हँडलवरूनही हा व्हिडिओ पोस्ट झाला. आमदारांच्या एक्स हँडलवरून पोस्ट झालेल्या व्हिडिओची चर्चा मुंबईपर्यंत पोचली. शेवटी तो व्हिडिओ डिलिट करण्यात आला.
सोलापूर लोकसभा मतदार संघात काँग्रेसतर्फे आमदार प्रणिती शिंदे व भाजपतर्फे राम सातपुते मैदानात आहेत. दोन युवा व आक्रमक आमदार मैदानात आल्याने प्रचाराची चुरस दिवसेंदिवस वाढत आहे.
आमदार शिंदे ज्या शहर मध्यमधून प्रतिनिधित्व करत आहेत, त्या मतदार संघात मोची समाजाचे मतदान निर्णायक आहे. या समाजातील युवकांवर दाखल झालेल्या गुन्ह्याचा विषय हातात घेऊन आमदार सातपुते यांनी व्होट बँकेला हात घालण्याचा प्रयत्न केल्याचे दिसले.