दोन दिवसांत पाणी सोडा अन्यथा …….

ऐन उन्हाळ्यात शेतातील उभी पिके व फळ पिके तसेच जनावरे, माणसांना पाण्याची नितांत गरज होती. अशावेळी उन्हाळी सिंचन आवर्तनादरम्यान गळतीची घटना घडल्याने चालू आवर्तनात खंड पडल्याने हजारो शेतकरी धास्तावले आहेत . याच शेतकऱ्यांचा आवाज मोहिते पाटील आणि जानकर यांनी धडक मोर्चाच्या रूपाने फलटण येथे नेला . येत्या दोन दिवसात दुरुस्ती करून आवर्तन सुरु करा अन्यथा धरणावर जाऊन दरवाजे उघडू, असा इशारा उत्तम जानकर यांनी अधिकाऱ्यांना दिला आहे . एकंदर माढा लोकसभेची निवडणूक झाली असली तरी काल पुण्यात मतदान होत असताना या मोर्चाचा फायदा विरोधकांना मिळू शकणार आहे .