रेल्वेत नोकरी करू इच्छिणाऱ्या लोकांसाठी चांगली संधी आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेमध्ये 733 अशा विविध पदांवर भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. तरी ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे सेंट्र्ल रेल्वेच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात. अर्ज कसा करायचा या संबंधित सविस्तर माहिती वेबसाईटच्या अधिकृत पेजवर दिली आहे.
रेल्वेतील नवीन भरती प्रक्रियेसाठी अर्ज कसा करायचा? त्यासाठी आवश्यक पात्रता आणि निवड प्रक्रिया कशी असेल? या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने प्रशिक्षणार्थी पदांच्या भरतीसाठी अर्ज मागविले आहेत. या पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार SECR च्या अधिकृत वेबसाईट secr.indianrailways.gov.in वर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेद्वारे या विभागात एकूण 733 पदे भरण्यात येणार आहेत.
रेल्वेतील भरती प्रक्रियेसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर त्यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 12 एप्रिल 2024 आहे.
पात्रता
उमेदवारांनी 10+2 प्रणाली अंतर्गत 10 वी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी आणि मान्यताप्राप्त संस्थेतून संबंधित ट्रेडमधील ITI अभ्यासक्रम. उमेदवाराची वयोमर्यादा 15 ते 24 वर्षांच्या दरम्यान असावी.
निवड प्रक्रियेमध्ये मॅट्रिकमध्ये मिळालेले गुण आणि आयटीआय परीक्षेत मिळालेले गुण यांचा समावेश असेल, दोघांनाही समान महत्त्व दिले जाईल. दोन्ही परीक्षांमध्ये किमान 50% गुणांसह उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. निवडलेल्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणीच्या वेळी वैद्यकीय प्रमाणपत्र आणण्याचा सल्ला दिला जाऊ शकतो.
निवडलेल्या उमेदवारांना शिकाऊ म्हणून नियुक्त केले जाईल आणि प्रत्येक ट्रेडसाठी 1 वर्षाच्या कालावधीसाठी शिकाऊ प्रशिक्षण घेतले जाईल. अधिक संबंधित माहितीसाठी उमेदवार दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.