तुम्हीही नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी हि कामाची बातमी आहे. भारतीय स्टेट बँक अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.
पद संख्या : 68
पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) ऑफिसर (Sportsperson) : (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) गेल्या 3 वर्षात आंतरराष्ट्रीय स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व केलेले असावे.
2) क्लेरिकल (Sportsperson) : (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) संयुक्त विद्यापीठ संघाचा एक भाग म्हणून, त्याने राज्य, जिल्हा किंवा विद्यापीठासाठीच्या कार्यक्रमांमध्ये चांगली कामगिरी केली असावी किंवा आंतर-विद्यापीठ कार्यक्रमात त्याने विद्यापीठासाठी चांगली कामगिरी केली असावी. .
क्रीडा प्रकार : बास्केटबॉल, क्रिकेट, फुटबॉल, हॉकी, व्हॉलीबॉल, कबड्डी, टेबल टेनिस, बॅडमिंटन
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 एप्रिल 2024 रोजी, 20 ते 30 वर्षे [SC/ ST : 10 वर्षे सूट]
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 ऑगस्ट 2024
महत्वाच्या सूचना :
या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑगस्ट 2024 आहे.