विराट कोहलची क्रेझ कायम……

सध्या क्रिकेट विश्वात IPL 2024 ची क्रेझ शिगेला पोहोचली आहे. इंडियन प्रीमियर लीगचा 17वा हंगाम 26 मे रोजी संपणार आहे. मात्र त्यानंतर अवघ्या 5 दिवसांनी आयसीसी टी-20 विश्वचषक 2024 सुरू होणार आहे. याचदरम्यान टी-20 वर्ल्ड कप 2024 चे एक पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पोस्टरमध्ये भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू विराट कोहलीचा देखील फोटो आहे.

आयसीसीकडून अजूनही या पोस्टरबाबत अधिकृत ट्विट करण्यात आलेले नाही. मात्र आयसीसीच्या मोठ्या स्पर्धेत अजूनही विराट कोहलीची क्रेझ कायम असल्याचे दिसून येतंय.आयसीसीने टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी संघांच्या घोषणेची तारीख निश्चित केली आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व 20 संघांना 1 मे पूर्वी घोषणा करण्याची सूचना दिली आहे. तसेच 25 मे पर्यंत प्रत्येक संघाला त्यांच्या संघात फक्त एकच बदल करण्याची मुभा देखील असणार आहे. 

पीटीआयनुसार, भारतीय संघाची निवड समिती आयपीएल 2024 चा पहिला टप्पा संपल्यानंतर 15 खेळाडूंचा संघ जाहीर करेल. तोपर्यंत निवडकर्त्यांना खेळाडूंच्या फॉर्मची कल्पना आली असेल. आयपीएल 2024 च्या प्लेऑफमध्ये पोहोचू न शकलेल्या संघातून निवडलेले खेळाडू लवकरच अमेरिकेला रवाना होईल. गेल्या वर्षी डब्ल्यूटीसी फायनलसाठीही असेच काहीसे करण्यात आले होते.

पात्र ठरलेले 20 संघ…

अमेरिका, वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, नेदरलँड्स, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, अफगाणिस्तान, बांगलादेश, आयर्लंड, स्कॉटलंड, पापुआ न्यू गिनी, कॅनडा, नेपाळ, ओमान, नामिबिया, युगांडा