IPL 2024 :आरसीबीच्या प्लेऑफच्या आशा वाढल्या! पुढचं गणित मुंबई ठरवणार

आयपीएल 2024 स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची सुरुवातीला स्थिती नाजूक होती. मात्र त्यानंतर आरसीबीने चांगलं कमबॅक केलं आहे. रॉयल चॅलेंजर्स बंघळुरुने गुजरात पराभूत करत आपणंही रेसमध्ये असल्याचं दाखवून दिलं आहे. बंगळुरुच्या एम चिन्नास्वामी मैदानात गुजरात टायटन्सने बंगळुरुला चार गडी राखून पराभूत केलं. यासह आरसीबीने गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर थेट सातव्या स्थानी झेप घेतली आहे.

सलग तीन सामन्यात विजय मिळवत बंगळुरुचा संघ सातव्या स्थानी आहे. पंजाब किंग्स आणि गुजरातचे प्रत्येक 8 गुण आहेत. मात्र या दोन्ही संघांच्या तुलनेत आरसीबीचा रनरेट चांगला आहे. गुजरातविरुद्धचा सामना कमी षटकात संपवल्याने त्याचा फायदा झाला आहे.गुजरात विरुद्धचा सामना आरसीबीने 38 चेंडू शिल्लक ठेवून पूर्ण केला. आरसीबीचा नेट रनरेट -0.0149 इतका झाला आहे. तर गुजरातचा नेट रनरेट -1.320 इतका आहे.आतापर्यंत आरसीबीने एकूण 11 सामने खेळले आहेत. त्यापैकी चार सामन्यात विजय मिळवून 8 गुण झाले आहेत.

तर उर्वरित तीन सामने जिंकून 14 गुण होऊ शकतात. आरसीबीचा पुढचे तीन सामने पंजाब किंग्स, दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्सशी आहेत. राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्सला गाठणं कठीण आहे. त्यामुळे लखनौ आणि हैदराबादची कामगिरी महत्त्वाची ठरेल.लखनौ आणि हैदराबादचे प्रत्येकी 12 गुण असून चार सामने शिल्लक आहे. या दोन्ही संघ तीन सामन्यात पराभूत झाल्यास आरसीबीला संधी मिळेल.

मुंबई इंडियन्स या स्पर्धेतून बाहेर गेली आहे. त्यात मुंबईचे तीन सामने सनरायझर्स हैदराबाद, कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनौ सुपर जायंट्सशी आहेत. या तिन्ही सामन्यात मुंबई इंडियन्सने बाजी मारली तर आरसीबीला फायदा होईल. तसेच मुंबईचे फक्त 12 गुण होतील. त्यामुळे प्लेऑफ गाठणं शक्य नाही. त्यामुळे आरसीबी 14 गुणांसह प्लेऑफमध्ये जाऊ शकते.